
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एसटी महामंडळाने एकूण ३६७ पदांसाठी भरती जाहीर केली असून, अभियांत्रिकी व ITI उत्तीर्ण उमेदवारांना यात संधी मिळणार आहे. या भरतीसाठी ११ ऑगस्ट २०२५ ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
भरतीची जाहिरात महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती प्रशिक्षणार्थी पदांसाठी असून प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक येथे असणार आहे.
पदांची यादी:
अभियांत्रिकी पदवीधर, मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक), पेंटर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग), इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, कारपेंटर आदी विविध पदांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
उमेदवाराचे वय १४ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
सर्वप्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे उपलब्ध अर्जाचा नमुना भरून सादर करावा.
ही संधी गमावू नका! इच्छुक उमेदवारांनी निर्धारित मुदतीत अर्ज पूर्ण करून भविष्यातील करिअरची दिशा ठरवावी.