
सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा पोलिस दलाच्या श्वान पथकातील प्रशिक्षित आणि यशस्वी श्वान ‘सुर्या’ याचे आज सकाळी 10 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोस्टमार्टेमनंतर सुर्याचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात येणार आहेत. श्वान पथकातील सुर्या हा केवळ दलातील महत्त्वाचा घटक नव्हता, तर त्याने राष्ट्रीय पातळीवरही साताऱ्याचा नावलौकिक वाढवला होता.
ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुर्याने सुवर्णपदक मिळवून भारतात पहिल्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले होते. त्याच्या अचानक जाण्याने पोलिस दलाला मोठा धक्का बसला आहे.