
मुंबई प्रतिनिधी
दुर्बल व गरजू कुटुंबातील मुलींना सशक्त करणारा सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम
मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ‘लेक लाडकी’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातील मुलींना थेट १ लाख १ हजार रुपयांची मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे. राज्यातील हजारो कुटुंबांना या योजनेचा मोठा आधार मिळणार आहे.
काय आहे ‘लेक लाडकी’ योजना?
१ एप्रिल २०२३ पासून राज्यात सुरू झालेली ‘लेक लाडकी’ योजना ही आधीच्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत सुधारणा करून आणण्यात आली आहे. या योजनेत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने ₹१,००,००० इतकी रक्कम दिली जाते.
या योजनेमागील उद्देश —
* मुलींचा जन्मदर वाढवणे
* शिक्षणाला प्रोत्साहन देणे
* बालमृत्यू दर कमी करणे
* कुपोषण रोखणे
* शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे
* बालविवाह रोखणे
कोण पात्र आहेत?
* अर्जदार कुटुंबाकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका असणे आवश्यक
* कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
* मुलीचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत
* लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्रातील असणे आवश्यक
* फक्त पहिल्या दोन अपत्यांमधील मुलींनाच लाभ
* दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र अनिवार्य
* दुसऱ्या वेळी जुळ्या मुली झाल्यास देखील लाभ, पण त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक
अर्ज कुठे व कसा करायचा?
* अर्ज महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद, बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध
* अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने देखील शक्य
* अंगणवाडी सेविका (ग्रामीण व नागरी भागात) अर्ज स्वीकृत करतील
*आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा
* मुलीचा जन्म झाल्यानंतर लवकरात लवकर अर्ज सादर करावा
मिळणारी आर्थिक मदत कशी?
* जन्मापासून १८ वर्षे वयापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत
* एकूण ₹१,०१,००० इतका निधी
* विशिष्ट टप्प्यावर ठरावीक रक्कम दिली जाईल (शिक्षण, लसीकरण, शालेय प्रवेश इत्यादींवर आधारित)
योजना कोणासाठी?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष घटक गट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.
शेवटी एक महत्त्वाची सूचना:
‘लेक लाडकी’ योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती मुलीच्या संपूर्ण विकासाचं आणि सुरक्षित भविष्यासाठीचं बळकटीकरण आहे. आपली मुलगी जन्मल्यानंतर या योजनेसाठी लवकरात लवकर संपर्क प्रकल्प अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकांशी करा.