
मुंबई प्रतिनिधी
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. कमी किमतीत जास्त लाभ देणाऱ्या जिओने आता असा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे, जो ग्राहकांना वर्षभरासाठी अमर्यादित 5G डेटा वापरण्याची मुभा देतो. या प्लॅनची किंमत केवळ ₹601 असून, तो स्वतःसाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी भेट म्हणूनही खरेदी करता येतो.
काय आहे या प्लॅनची खासियत?
रिलायन्स जिओचा ₹601 चा प्लॅन काही अटींसह येतो. या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला 12 व्हाउचर दिले जातात. दर महिन्याला एक व्हाउचर My Jio App मधून ऍक्टिव्ह करून वापरता येते. प्रत्येक व्हाउचरसह, ग्राहक अमर्यादित 5G डेटाचा आनंद वर्षभर घेऊ शकतो.
कोण वापरू शकतो हा प्लॅन?
या व्हाउचरचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे – वापरकर्त्याच्या नंबरवर सध्या 1.5GB/Day डेटाचा प्लॅन सक्रीय असणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांकडे 1GB डेटा किंवा वार्षिक ₹1899 चा प्लॅन आहे, त्यांना या ₹601 च्या व्हाउचरचा लाभ मिळणार नाही.
व्हाउचर कसे खरेदी करायचे?
हा स्पेशल प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:
* https://www.jio.com/gift/true-5g या जिओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
* ज्या व्यक्तीला व्हाउचर भेट द्यायचे आहे, त्यांचा जिओ नंबर एंटर करा.
* ₹601 चे पेमेंट केल्यानंतर व्हाउचर त्यांच्या खात्यावर ऍड होईल.
व्हाउचर रिडीम कसे करायचे?
* My Jio App उघडा
* ‘My Vouchers’ विभागात जा
* एका महिन्यासाठी व्हाउचर रिडीम करा
* आणि वर्षभर 5G डेटाचा अमर्यादित आनंद घ्या!
जिओने पुन्हा एकदा स्पर्धकांना मागे टाकत ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. केवळ ₹601 मध्ये वर्षभरासाठी अमर्यादित 5G डेटा – हा प्लॅन खरेच एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
तुमच्याकडे 1.5GB/Day प्लॅन आहे का? तर मग आजच हे व्हाउचर खरेदी करा आणि 5G चा वेग अनुभवत रहा – वर्षभर!