
वांद्रे -प्रतिनिधी
वांद्रे पूर्व परिसरात गेले ३ दिवस पाईपलाईन फुटून रस्त्यावर पाणी पसरले होते या परिसरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची वाहतूक होत असते तसेच लोकांची रहदारी सतत चालूच असते.रस्त्या लगत कार्डिनल ग्रेसेस शाळा देखील आहे.शाळेतल्या मुलांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते.स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विश्वास जाधव यांनी या फुटलेल्या पाईपलाईन ची सोमवार १६/१२/२०२४ रोजी तक्रार महानगर पालिकेच्या कार्यालयात जाऊन केली.महानगर पालिकेचे मुकादम मेंटेनस कर्मचारी राजेश धुरी व त्यांचे सहकारी मंगळवार १७/१२/२०२४ रोजी जागेवर येऊन सकाळी ५ वाजता पाण्याचा पाईप तुटला होता तो दुरुस्त करून रहिवाशांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला या बद्दल स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विश्वास जाधव यांनी सर्व महानगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.