
पुणे-प्रतिनिधी
पुणे : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. सराइताकडून दोन पिस्तुले, तसेच सहा काडतुसे जप्त करण्यात आली. निलेश ज्ञानेश्वर भरम (वय ३५, रा. वैष्णवी प्रेस्टीज, साईसिद्धी चौक, आंबेगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव अहो.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भरम हा दरीपूलाजवळ येणार असून त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. त्याची अंगझडती घेतली असता ८६ हजार रुपयांचे २ पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे आढळून आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, निखिल जाधव, विजय पवार, नागनाथ राख, विनोद चव्हाण, राहुल शिंदे, अमोल सरडे, संजय आबनावे, प्रमोद कोकणे, व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.