
सातारा प्रतिनिधी
सातारा – जीवनज्योत हॉस्पिटलचे संस्थापक आणि साताऱ्यातील प्रसिद्ध सर्जन डॉ. अशोक गोंधळेकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रुग्णसेवेसाठी त्यांचे योगदान व सेवाभाव उल्लेखनीय ठरले. त्यांच्या जाण्याने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्राला अपूरणीय अशी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, तसेच त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.