मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारच्या गृह विभागाने प्रशासकीय कारणास्तव मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, भारतीय पोलिस सेवा (IPS) तसेच राज्य पोलिस सेवा (SPS) गटातील एकूण ८३ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश काल (२६ जून) रोजी जारी करण्यात आले. या बदल्यांमध्ये सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) यांसह राज्यातील प्रमुख शहरांचा समावेश आहे.
या फेरबदलात सोलापूर शहरातील पोलिस उपायुक्त डॉ. अजित सुदाम बोऱ्हाडे, विजय हरिभाऊ कबाडे आणि दीपाली धनंजय काळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गौहर महबूब हसन, अश्विनी पांडुरंग पाटील आणि अश्विनी पी. पाटील यांची नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, सोलापूर शहराला अद्यापही तिसरा उपायुक्त मिळालेला नसून त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रमुख बदली अधिकारी आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या :
डॉ. तेजस्विनी सातपुते — समादेशक, राज्य राखीव पोलिस बल क्र. १, पुणे
डॉ. अमोल भाऊसाहेब तांबे — पोलिस अधीक्षक, लातूर
अश्विनी जनार्दन सानप — पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग
संजय वाय. जाधव — समादेशक, एसआरपीएफ बल क्र. ११, नवी मुंबई
शीतल शिवाजी झगडे — पोलिस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई
प्रदीप मारुती जाधव — पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
सागर अनिल पाटील — पोलिस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई
अर्चना दत्ता पाटील — अप्पर पोलिस अधीक्षक, भोकर (नांदेड)
संदीप बाबूराव डोईफोडे — पोलिस उपायुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार
रमेश शंकर सोनवणे — पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण
दीपाली धनंजय काळे — समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. १०, सोलापूर
गौहर महबूब हसन — पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
अश्विनी पांडुरंग पाटील — पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
स्मिता रामदास पाटील — पोलिस उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
राजलक्ष्मी हनुमंतराव शिवणकर — पोलिस उपायुक्त, पुणे शहर
कृषिकेश संभाजी रावले — पोलिस उपायुक्त, पुणे शहर
सागर पांडुरंग कवडे — पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर
भाग्यश्री काशिनाथ नवटके — समादेशक, आयआरबी-२, गोंदिया
डॉ. गीता सुधीर चव्हाण — पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक
शर्मिला रमेश घार्गे — पोलिस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर
प्रज्ञा दिलीप जेढे — पोलिस उपायुक्त, मध्य रेल्वे, बृहन्मुंबई
बदली रद्द झालेले अधिकारी :
जयंत मीना — पोलिस अधीक्षक, लातूर
दत्ता नलावडे — पोलिस उपायुक्त, मुंबई लोहमार्ग
पंकज कुमावत — पोलिस अधीक्षक, (स्थानिक विभाग – बदली रद्द)
बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूरमधील महत्त्वाच्या बदल्या :
डॉ. अजित सुदाम बोऱ्हाडे — पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई
विजय हरिभाऊ कबाडे — पोलिस उपायुक्त, नागपूर शहर
डॉ. निलेश विजय अष्टेकर — पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई
महेंद्र दिनकर पंडित, सुनील शंकर लोखंडे, तुषार अण्णासाहेब पाटील, वसंत दत्तात्रय जाधव — पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई
श्वेता किशोर खेडकर, संदीप सुधाकर आटोळे — पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
नित्यानंद नारायण झा, किशोर विनायक काळे, सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी — पोलिस उपायुक्त, नागपूर शहर
स्मार्तना भारत पाटील — प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
सुनिता साळुंखे ठाकरे — पोलिस उपायुक्त, पश्चिम रेल्वे, मुंबई
या बदल्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन पोलिस अधीक्षक आणि उपायुक्त रुजू होणार असून, प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा गृह विभागाने व्यक्त केली आहे. राज्याच्या सुरक्षायंत्रणेत नवे दमदार चेहरे उतरले असून, स्थानिक स्तरावर बदलाचे वारे जाणवणार आहेत.
गृह विभागाच्या या निर्णयामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी काही फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.


