
मुंबई,सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
लाखो वापरकर्ते WhatsApp आणि Instagram वापरतात, मेटा या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीच्या लोकप्रिय सेवा. बुधवारी रात्री अचानक या सोशल मीडिया ॲप्समध्ये समस्या दिसू लागल्या आणि बरेच वापरकर्ते बराच काळ त्रस्त राहिले. प्रत्यक्षात पुन्हा एकदा व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम अचानक डाऊन झाले. मात्र, जागतिक बंदनंतर दोन्ही सेवा आता व्यवस्थित काम करत आहेत.
[espro-slider id=1095]
तर व्हॉट्सअपच्या बाबतीतही तेच घडलं आहे. मेसेज अजिबात सेंड होत नाही. कनेक्शन हे डाऊन झालं आहे. तर दुसरीकडे इंस्टाग्रामसोबतही असाचा प्रकार घडला आहे. इंस्टाग्रामवर एकही रिल पाहता येत नाही. तर काही जणांसोबत इंस्टाग्राम अॅप ओपन होत नाहीये.
मेटाच्या मालकीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम हे प्रसिद्ध सोशल मीडिया ऍप्स आहेत. ज्यावर लोक आपला बहुतांश वेळ घालवतात. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असतात. तसेच काही ना काही पोस्ट करत असतात. त्यामुळे असे अनेक लोक आहेत, जे यांच्या शिवाय राहूच शकत नाही. पण अचानक बुधवारी रात्री मेटाची सेवा ठप्प झाली.
मेटा का बंद पडलं, याचं कारण कळू शकलेलं नाही, परंतू यामुळे ट्वीटरवर मात्र मीम्सचा पाऊस पडत आहे. मेटा का बंद झालं हे जाणून घेण्यासाठी अचानक ट्वीटर म्हणजेच X वर गर्दी केली आहे. इथे #facebookdown, #instagramdown असा हॅशटॅग देखील ट्रेंड होऊ लागला आहे.