
पुणे प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी..
पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी) सेल कार्यालयात नवीन मतदार नोंदणी, आधार कार्ड, ई- श्रम कार्ड शिबिर घेण्यात आले.काँग्रेस पार्टी ओबीसी सेल खडकवासला विधानसभा अध्यक्ष श्रीमहेश इंगवले यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कार्यालय (अंजली नगर )पुणे येथे नवीन मतदार नाव नोंदणी, आधार कार्ड, ई श्रम कार्ड शिबिर कार्यक्रम घेण्यात आला.एकाच ठिकाणी नागरिकांना या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या
यासाठी ०१ डिसेंबर २०२४ पासून दर रविवारी हे शिबिर अध्यक्ष श्री महेश इंगवले यांच्या स्व:खर्चातून नागरिकांसठी हे शिबिर उपक्रम राबवत असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले.
पुणे विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी, यांच्याशी संवाद साधताना श्री इंगोले म्हणाले की, आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा ना. श्री अजित (दादा) पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन,विकास हेचध्येय,गोरगरीब, कष्टकरी जनतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, शासकीय कार्यालयात, बँक स्तरावर, मुलाच्या शिक्षणासाठी, व शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी, आधार कार्ड, ई श्रम कार्ड,मतदान कार्ड हे अत्यावश्यक आहे, तरी ते काम गरीब जनतेने शासकीय कार्यालयात करून घेण्यासाठी हेलपाटे मारावी लागतात त्यामुळे गरीब जनतेला मी स्व:खर्चातून हा उपक्रम स्व:खर्चातून हा उपक्रम राबवत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळेस पुणे विभागीय प्रतिनिधी दैनिक युवक आधार
तथा शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे श्री सुनील (आप्पा)कलशेट्टी, दत्ता मोहोळ, अध्यक्ष सौ गीता इंगवले सावित्रीबाई फुले महिला मंडळ,खडकवास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कार्याध्यक्ष सौ सारिका सोनवणे खडकवास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल वार्ड
अध्यक्षा सौ अलका सहजराव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी असेल सदस्य श्री शंकर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया प्रमुख श्री दादा इंगवले, आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.