#sataranews Archives - Satara Pratinidhi

शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती
सातारा प्रतिनिधी

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी विक्रमशील कदम यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी केले.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २८(२)(झ) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यत्वाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आला असून, या कालावधीत सौ. कदम यांचे सिनेट सदस्यत्व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सदस्यत्वाशी संलग्न राहणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकांमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये सौ. कदम यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी नियुक्तीपत्रातून व्यक्त केली आहे. या नियुक्तीमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधित्वाला विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

सौ. तेजस्विनी कदम यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाकडूनही सौ. तेजस्विनी कदम यांचे अभिनंदन करण्यात आले.

The post शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती appeared first on Satara Pratinidhi.

रेवडीतील पारधी समाज पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
सातारा | प्रतिनिधी

कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावात पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेवडी येथील महसूल गट क्रमांक ३१९ मध्ये प्रस्तावित असलेल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असतानाच, याच गायरान जमिनीवर पारधी समाजाकडून बेकायदेशीर वास्तव्यास सुरुवात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित समाजाचे अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सध्या ७० ते ८० पारधी समाजातील व्यक्ती गायरान जमिनीवर राहत असून, सुमारे दहा वर्षांपूर्वी येथे केवळ एकच कुटुंब होते. कोणतीही अधिकृत नोंद नसताना लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रेवडी गावातील यात्रेदरम्यान ‘जंपिंग झपांग’ लावण्यावरून झालेल्या वादानंतर गावातील तीन युवकांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरपंच व पोलीस पाटील यांच्या मुलाचाही समावेश आहे. हा गुन्हा खोटा असून, आणखी युवकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पारधी समाजाकडून प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांचा दावा आहे की, गायरान जमिनीवर घरकुल मंजूर करून द्यावे, अन्यथा गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, यापूर्वी मुंबईचे तत्कालीन आयुक्त यांनी ही मागणी फेटाळून लावत ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय दिला होता. त्या निर्णयाचा राग धरून गावकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. शेतमाल चोरी, तसेच उसतोड मजूर गावात येण्यास नकार देत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याच परिसरातून सातारा स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली.

या प्रकरणाबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रेवडी ग्रामस्थांच्या वतीने ॲड. वैभव मोरे पाटील यांनी सांगितले की, “गावातील युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही युवक पोलीस भरतीची तयारी करत असून, अशा केसेसमुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी, मात्र निरपराध युवकांवरील खोटे गुन्हे थांबवावेत.”

या संपूर्ण प्रकरणामुळे रेवडी गावातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

The post रेवडीतील पारधी समाज पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप appeared first on Satara Pratinidhi.

साताऱ्यात आरटीओला जप्त वाहनांची डोकेदुखी; दंड न भरल्यास लिलाव
सातारा प्रतिनिधी

सातारा : प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (आरटीओ) जप्त, दंडित तसेच चोरीची वाहने मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने प्रशासनापुढे जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यालयाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहन ठेवण्यासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असून सध्या सुमारे १७० वाहने कार्यालय परिसरात धुळखात पडून आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित वाहनमालकांनी थकीत दंड भरून आपली वाहने तात्काळ घेऊन जावीत, अन्यथा नियमांनुसार या वाहनांचा लिलाव केला जाईल, अशा आशयाच्या नोटिसा आरटीओकडून पाठवण्यात आल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात सातारा, कऱ्हाड आणि फलटण अशी प्रादेशिक परिवहन विभागाची तीन कार्यालये असून, या तिन्ही ठिकाणी आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी कार्यालयांच्या उपलब्ध जागेत कारवाईदरम्यान पकडलेली, जप्त केलेली, दंड न भरल्याने ताब्यात घेतलेली तसेच चोरीची वाहने ठेवण्यात आली आहेत.

ही वाहने जागा अडवून ठेवत असल्याने कार्यालयात पासिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच नियमित कामकाजासाठी येणाऱ्यांना वाहन पार्किंगसाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहनमालकांनी आपली वाहने परत घ्यावीत, यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघोले यांच्या निर्देशानुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आरटीओकडे सध्या असलेल्या १७० वाहनांपैकी काही वाहने अनेक वर्षांपासून तिथेच पडून आहेत, तर काही अलीकडेच जप्त करण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचा नियमानुसार लिलाव करण्यापूर्वी एकूण ४५० वाहनमालकांना दंड भरून वाहने ताब्यात घेण्याची अंतिम सूचना देण्यात आली आहे. मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास लिलावाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

The post साताऱ्यात आरटीओला जप्त वाहनांची डोकेदुखी; दंड न भरल्यास लिलाव appeared first on Satara Pratinidhi.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांने सन्मानित…
सातारा-प्रतिनिधी

सातारा – राष्ट्रीय सहकारी संघ यांच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस “सर्वोत्कृष्ट बँक” पुरस्कार भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (NCUI) चे अध्यक्ष श्री. दिलीप संघवी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रमोद कर्नाड तेलंगणा राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्री. श्रीनिवास राव यांचे शुभ हस्ते बँकेचे संचालक श्री. दत्तानाना ढमाळ, श्री. सुनील खत्री, श्री. रामराव लेंभे, श्री. लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अधिकारी श्री. वैभव सावंत, श्री. तुषार साबळे यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख आहे. जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, ‘शून्य’ टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५  मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला असून याच सर्वंकष कामकाजाबद्दल सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री. नितीन पाटील म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे .

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्कारांमुळे बँकेच्या नांवलौकिकामध्ये आणखी भर पडली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन .पी .ए ., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर .बी .आय . चे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत. बँकेच्या सर्वंकष उत्कृष्ट कामकाजामुळे बँकेस शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी अशा विविध नामांकित संस्थांकडून आजअखेर ११३ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

श्री. दिलीप संघवी यांनी सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून विशेष उल्लेख केला. श्री. प्रमोद कर्नाड यांनीही बँकेच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामकाजाची प्रशंसा केली.

या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. श्री. मकरंद पाटील, माजी सहकार मंत्री श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच सर्व संचालक सदस्य यांनी अभिनंदन करून  बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

The post उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कारांने सन्मानित… appeared first on Satara Pratinidhi.