
दिनांक 28.11.2024 रोजी गुप्त
बातमीदारा द्वारे माहिती मिळाली
की एक इसम अमली पदार्थ विक्री
करण्याकरता दिवा परिसरात
येत असल्याची खबर मिळाली
असता सदरच्या माहीतच्या
अनुषंगाने मुंब्रा पोलीस ठाणेचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल
शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो
नि पाचोरकर तसेच दिवा तपास
सपोनि तोरडमल,
सपोनि कोळेकर, पोना किशोर
वैरागकर, पोशि गायकवाड, पो
शि जाधव, पोशि तडवी, पोशि
सातपुते यांना कारवाई करण्यास
आदेशित करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने सदरचे पथक दिवा
परिसरात सापळा रचला असताना
दिनांक 29.11.2024 रोजी 01.55
वाच्या सुमारास गणेश तलाव
जवळ गणेश नगर, आगासन रोड,
दिवा पूर्व येथे एक संशयित इसम
संशयित रित्या फिरत असताना
मिळून आला असता त्या ताब्यात
घेऊन त्याची अंगझडती घेतली
असता त्याच्याजवळ अंदाजे 54
ग्रॅम वजनाची किंमत एक लाख
35 हजारांची एम डी पावडर मिळून
आली. सदर आरोपीस ताब्यात
घेऊन तपासाअंती त्याचे नाव सुरज
रामविलास शर्मा वय 34 वर्ष रा.
सिद्धिविनायक गेट जवळ, दिवा
पुर्व ठाणे असे समजले त्याच्या
विरोधात एनडीपीएस 1985
कलम 8 (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला असून
त्यास नमूद करण्यात आले आहे.
अटक आरोपीस मा. न्यायालया
समक्ष हजर करून पोलीस कोठडी
देऊन गुन्ह्याचा पुढील तपास
सपोनि तोरडमल हे करत आहे.