
मुंबई, सातारा प्रतिनिधी न्युज नेटवर्क
पायधुनी मुंबई परिसरात खंडणी विरोधी कक्ष यांनी अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे सहित तीन इसमाना घेतले ताब्यात
खंडणी विरोधी कक्ष मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार क्र-०४१२००/अमोल रामचंद्र तोडकर यांना सूत्रांकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली
की.काही संशयीत इसम विनापरवाना बेकायदेशीरपने अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे घेऊन ते विक्रीकरण्याच्या उद्देशाने दिनांक-२८/११/२०२४ रोजी रात्री प्रभू हॉटेल समोरची लेन,पी डिमेलो रोड,पायधुनी मुंबई येथे येणार आहेत.सादर माहितीची खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई यांनी शाहनिशा करून,अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणी सापळा रचुन तीन इसमाना त्यांच्या ताब्यातील दोन पिस्टल,एक रिव्हॉल्वर,तीन गावठी बनावटीचे सिंगल बोअर कट्टे,दोन रिकाम्या मेगझिन आणि एकूण ६७ जिवंत काडतुसे इत्यादी मालमत्ते सह.१)अभिषेककुमार अंजनीकुमार पटेल,वय-२६ वर्षे,२)सिध्दार्थ सुभोधकुमार सुमन वय-२३ वर्षे, ३)रचित रामशीषकुमार मंडल, वय-२७वर्षे,नमूद तीन आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.सदर बाबद पायधुनी पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल करून पुढील तपास खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई यांचे मार्फत करण्यात येत आहे.