सातारा प्रतिनिधी
सातारा शहरातील अनेक ठिकाणच्या जुगार अड्ड्याबाबत पोलिस अधीक्षकांनी अड्ड्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी एक पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैधरित्या धंदे करणार्यावर कडक कारवाई आदेश दिले होते.
शहरातील अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेशानंतर शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. करंजे नाका परिसरात केलेल्या कारवाईप्रकरणी जयदीप पोपटराव यादव (वय ४२, रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २० हजार २०० रुपये किमतीचा कॉम्प्युटर, जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार अमित झेंडे व पथकाने ही कारवाई केली.
दुसरी कारवाई राजवाडा परिसरात नगर वाचनालय परिसरात करण्यात आली. याप्रकरणी निखिल नामदेव सपकाळ (वय २८, रा. करंजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २१ हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य, कॉम्प्युटर, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार वैभव सावंत व पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तिसरी कारवाई अजंठा चौक परिसरात करण्यात आली. याप्रकरणी अविनाश सदाशिव साठे (वय ३०, रा. सदरबझार) याच्यावर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २५ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त केले. यामध्ये जुगाराचे साहित्य, सीपीयू, की बोर्ड, माउस, रोख रक्कम याचा समावेश आहे. हवालदार अमित झेंडे व पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यावर अशाचप्रकारे कारवाई केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जुगाराचे अवैध अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


