
मुंबई प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 25 ते 27 मे या कालावधीत महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या तीनदिवसीय दौऱ्यात ते नागपूर, नांदेड आणि मुंबई येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये भूमिपूजन, उद्घाटन, जनसभा आणि विशेष व्याख्याने यांचा समावेश आहे.
25 मे रविवारीअमित शाह रात्री 9:30 वाजता नागपुरात दाखल होणार आहेत. सोमवारी सकाळी 11 वाजता नागपुरातील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ‘स्वस्ति निवास’ पंथागाराचे भूमिपूजन होईल. दुपारी 1 वाजता कामठी तालुक्यातील चिंचोली येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या स्थायी परिसराचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या परिसराचे ई-उद्घाटन होईल. दुपारी 3 वाजता ते नांदेडला पोहोचतील. दुपारी 3 वाजता वसंतराव नाईक चौक, आनंद नगर, नांदेड येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. दुपारी 3:30 वाजता विद्युत नगर चौक येथे विविध कार्यक्रम, 3:50 वाजता कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक आणि सायंकाळी 5:15 वाजता नाना-नानी पार्क इंडस्ट्रियल एरिया येथे उद्घाटनासाठी वेळ राखीव आहे. सायंकाळी 6:30 वाजता नवा मोडा ग्राउंड येथे जनसभा होईल. रात्री 10:00 वाजता ते मुंबईत दाखल होतील.
27 मे मंगळवारी सकाळी 10:30 वाजता मुंबईतील श्री लक्ष्मी नारायण मंदिर, माधव बाग येथे मंदिराच्या 150व्या वर्धापनदिन सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई विद्यापीठातील सर कावसजी जहांगीर सभागृहात विशेष व्याख्यान होईल. दुपारी 2:30 वाजता ते नवी दिल्लीला रवाना होतील.