
पुणे प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील गेल्या सात दिवसांपासून फरार असणारा तिचा सासरा आणि दीराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज पहाटे २३ मे रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास बावधन पोलिसांनी सापळा रचून अटकेची कारवाई केली.
पोलिसांच्या या कारवाईनंतर आता हगवणे घरातील मोठी सून मयुरी हगवणेची पोलिसांनी केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया समोर आली आहे.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे, या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करतील. आत्महत्या प्रकरणात माझ्या नवऱ्याला सुशील हगवणे यांना गोवण्यात आलं आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया मयुरी जगताप हगवणे हिने दिली आहे.
अटक केल्यानंतर दोघांची विचारपूस केली जाईल आणि योग्य ती कारवाई त्या दोघांवर केली जाईल. ज्यांनी-ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका तिने मांडली. माझ्या तक्रारीनंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असती, तर आज हे प्रकरण घडलं नसतं, असेही ती यावेळी बोलताना म्हणाली. या संपूर्ण प्रकरणात मुयरीने निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. निलेश चव्हाण ही व्यक्ती भांडणामध्ये मध्यस्थी करत होती, असा दावा करण्यात आला आहे. तसेच स्वःताच्या पत्नीचा अमानुष छळाचा आरोपही त्याच्यावर आहे.
स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ
वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाणचा इतिहास स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाने धाक दाखविल्याचा गुन्हा याच पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.