पुणे प्रतिनिधी
स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे.आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ८९३ पानांचे हे दोषारोपपत्र दाखल केलं आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजनगर येथील सत्र न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ५२ दिवसात तपास पूर्ण करत आज दोषारोपपत्र दाखल केलंय.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता गाडेने एका मुलीवर अत्याचार केला होता. परगावी निघालेल्या एका प्रवासी तरुणीला आरोपी गाडेने वाहक असल्याची बतावणी करत तिच्यावर अत्याचार केला होता. आरोपी गाडेने एका शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला होता. पीडिता मुलगी फलटणला जात होती, त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडेने तिला चुकीच्या शिवशाहीत बसमध्ये बसण्यास सांगितलं.
त्या शिवशाही बसमध्ये कोणीच नव्हतं. अंधाराचा फायदा घेत त्या बसमध्ये दत्तात्रय गाडेने फलटणाला जाणाऱ्या मुलीवर दोनदा अत्याचार केला. त्याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दोनदा बलात्कार केला. या घटनेचे राज्यात पडसाद उमटले होते. परंतु या गुन्ह्यामध्ये आरोपीचे मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाहीआ
“पोलिसांचा गणवेश”
आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून फिरत असायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आलीय. गाडेकडे असलेल्या मोबाईल फोनमध्ये पोलीस गणवेश परिधान केलेले फोटो पोलिसांना मिळाले होते.
स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवीन अपडेट आलीय. आरोपी दत्ता गाडे याच्याविरोधात पुणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी ८९३ पानांचे हे दोषारोपपत्र दाखल केलं आहे.


