
मिरारोड प्रतिनिधी
काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ ने अंमली पदार्थ विरोधात मोठी आणि यशस्वी कारवाई करत तब्बल २२.३३ कोटी रुपये किमतीचं कोकेन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिक आणि एक भारतीय महिला अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
१५ एप्रिल रोजी काशिमीरा गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सबीना शेख (वय ४२, रा. मोतीलाल नगर, भाईंदर पूर्व) हिच्याकडे कोकेन असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तिच्याकडून ११ किलो ८३० ग्रॅम कोकेन (किंमत रु. १७.७४ कोटी) व ८०,००० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान या अंमली पदार्थांचा पुरवठा नायजेरियन नागरिक अँडी उबाबुडिके ओन्यिन्से (वय ४५, रा. मिरा रोड पूर्व) याच्याकडून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यालाही अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २ किलो ६०४ ग्रॅम कोकेन (किंमत रु. ३.९० कोटी) व १.०४ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
अधिक तपासात अँडीने हे कोकेन कॅमेरूनची महिला क्रिस्टेबेल एन्जेई (वय ३२, रा. वसई पूर्व) हिच्याकडून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिलाही अटक केली असून तिच्याकडून ४३३ ग्रॅम कोकेन (किंमत रु. ६४.९८ लाख), १ लाख रुपये रोख व परकीय चलन हस्तगत करण्यात आले आहे.
या कारवाईत काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त भास्कर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली
सदर गुन्ह्याचा तपास पो. उप-निरीक्षक उमेश भागवत (गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा) करीत असून सहा. पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो. उप-निरीक्षक संदीप शिंदे, सहा. पो. उप-निरीक्षक अशोक पाटील, अविनाश गर्ज पाटील, सुधीर खोत, सचिन हुले, यो. मत. विसपुते, धिरज मेंगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे तसेच महिला कर्मचारी दिपाली जाधव व संतोष चव्हाण (सायबर गुन्हे शाखा) यांच्यासह मसुब किरण आसवले यांचा या कारवाई सहभाग होता.