
पुणे प्रतिनिधी
पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये झालेल्या तरुणीवरील अत्याचाराने सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आता पीडित तरूणीचा जबाब न्यायालयात नोंदवण्यात आला आहे.
इन कॅमेरा हा जबाब नोंदवण्यात आला असून लिफाफा बंद पाकिटात सादर करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी नेमकं काय घडलं हे सगळं सविस्तरपणे जबाबात सांगण्यात आले आहे.
पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित मुलीने कोर्टात जबाब नोंदवला आहे. या जबाबात तिने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. ज्या पद्धतीने ही घटना घडली तेव्हा ते कुठे निघाली होती? काय करत होती? आरोपी नेमका काय बोलला? याची सविस्तर माहिती तरूणीने दिली आहे. मुलीचा जबाब हा या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची मानली जाते. या संदर्भातील तपशील गोपनीय ठेवला असून अद्याप तो बाहेर आलेला नाही.
दत्तात्रय गाडे पोलिसांच्या कोठडीत
आरोपी दत्तात्रय गाडेला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी पोलीस कसून करत आहे. घटना घडल्यानंतर जवळपास 70 तासानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले होते. पुणे स्वारगेटमधील प्रकरण हे बलात्कार नसून संगनमताने केलेले शरीरसंबंध होते असा दावा आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाने केला होता. मात्र हा दावा खोटा असल्याचे समोर आले होते.
आरोपी दत्तात्रय गाडेचे दावे खोटे, पोलिस तपासात माहिती समोर नराधम आरोपी दत्तात्रय गाडे आणि तरुणी संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी पुरावे जमवण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी केली. त्यानुसार पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे आता गाडेचा बचाव आणखी कमकुवत होणार आहे. पोलीस ही बाब सुनावणीच्या वेळी कोर्टासमोर आणतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात सीडीआर, तरूणीचा महत्त्वाचा ठरणार आहे.