
मुंबई प्रतिनिधी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमी फायनल सामना आज दुबईत पार पडणार आहे. यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी महामुकाबला होणार असून या सामन्यात बाजी मारून कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नॉक आउट सामन्यांचा रेकॉर्ड खराब आहे. 2023 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियाने भारताचा फायनलमध्ये दारुण पराभव केला होता. मात्र टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल. तेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताची प्लेईंग 11 कशी असेल याबाबत जाणून घेऊयात.
भारत – ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?
भारत – ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये एकूण 151 वेळा आमने सामने आले आहेत. यापैकी 84 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केलाय तर 57 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजय मिळवला आहे. तर यापैकी 10 सामने हे अनिर्णित राहिलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियात तीन सामने झाले, यापैकी दोन सामन्यात भारताचा तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.
भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार असून मंगळवारी दुपारी २ : ३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचे सामने प्रेक्षकांना टीव्ही तसेच डिजिटल गॅजेट्सवर पाहता येतील. टीव्हीवर हे सामानाने स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर दाखवले जातील. तर JioHotstar च्या अँप तसेच वेब साईटवर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पारपडेल.
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11 :
ट्रॅव्हिस हेड, कूपर कॉनोली, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंगलिस, अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, स्पेन्सर जॉन्सन, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा.