
उमेश गायगवळे.पत्रकार
विद्येची पंढरी म्हणून ओळखले जाणारं पुणे, सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक त्याचबरोबर विद्येचे माहेरघर शिक्षणाची पंढरी, पुणे तिथे काय उणे, अशा अनेक नावाने ओळखलं जाणार पुणे जिल्हा गेल्या आठवड्यापासून देशाच्या नव्हे तर जगाच्या रेषेवर पोचला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातलं सर्वात मोठं स्थान म्हणून ओळखलं जाणारं स्वारगेट एसटी बस स्थानक या स्थानकात गेल्या आठवड्यात मध्यरात्री एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रावर उमटले हे आपण सर्वांनीच वाचले पाहिले आरोपीला पकडले. तेही कसे पकडले हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
मात्र गेल्या काही वर्षापासून पुण्यात जी गुंडगिरी वाढली आहे. याला जबाबदार कोण? अवैध धंदे, दारू पार्ट्या, रात्रभर सुरू असणारे बार, पफ , मद्य प्राशन करून मध्यरात्री गाड्या चालवणे, तलवार गॅंग, रिवाल्वरचा धाक, गाड्यांची तोडफोड, हे जणू काही नित्याचे झाले आहे. हे केवळ पुण्यातच होऊ शकते अशी मिश्किल टिप्पणी लोक आता करू लागले आहेत.कारण सुसंस्कृत असलेल्या पुण्याला त्यांची जुनी ओळख आता पुसली जाणार असल्याचे ह्या सर्व घटनांनी सिद्ध होतं.
पुण्यात गेल्या काही महिन्यातला गुन्हेगारीचा आलेख पाहता तो वाढताच आहे. त्यामुळे पुण्यात या गुंडगिरी, लुटमार अवैध धंद्यांना, अवैद्य पफ ना जबाबदार कोण? पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पब वर कारवाई करण्यात आली स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर राज्यातील सर्व बस स्थानकांचे ऑडिट करण्यात सुरुवात झाली. कोयता गॅंग हातात तलवारी घेऊन गाड्यांची तोडफोड करत होती तसेच काही भागात टवाळखोर मंडळी मध्यरात्री रस्त्यावर उभे असलेल्या खाजगी गाड्यांची तोडफोड करत होती. या सर्व गाड्यावर हल्ला करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुंड हे कोण आहेत. याचा नेमका तपास कधी होणार. एखादी घटना घडल्यानंतर मग त्या संबंधित विभागाचे ऑडिट करायचं किंवा घटनेतील लोकांना सोडले जाणार नाही, फासावर लटकू, अशा बाता राजकारणी मंडळीकरत आहेत.
पण सुज्ञ पुणेकर गप्प कसे राहतात.हे समजेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात अनेक बलात्कार खून दरोडे हाणामाऱ्या लुटमार याला जबाबदार कोण आहेत ? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनेकदा दादांनी या सर्व बाबीवर कठोर कारवाई करण्याचा आश्वासन दिले. मात्र गुन्हेगारीचा आकडा काही कमी होताना दिसला नाही.
स्वारगेट एसटी बस स्थानक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर येत असली तरी पालकमंत्र्यांनी मात्र यावर ठोस प्रतिक्रिया देत नाही.
मग सर्व सामान्य नागरिकांनी महिलांनी पोलीस प्रशासनावर रोष ओढायचा की आणखी कुणावर? महाराष्ट्र राज्याची मान शरमेने देशात या घटनेने खाली गेली आहे.सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात एका सेकंदात जग हातात मिळत आहे.
महाराष्ट्रातील बीड, पुणे, नगर, हे जिल्हे बिहार होऊ पाहतायेत का?
खून दरोडे लुटमार दरोडे तोडफोड बलात्कार अशा गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई होताना दिसत नाही, तोपर्यंत हे गुन्हे काही थांबण्याचं दिसणार नाही.