
पुणे(विभागीय प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी
पुणे (दि.१४ फेब्रुवारी २०२५)–पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने तरंग हा अजय अतुल संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे. पुनीत बालन ग्रूप प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत १५ फेब्रुवारी २०२५ला बदल करण्यात येत आहे.
मॉडर्न चौक ते डेक्कन वाहतूक विभाग पर्यंत (१०० मिटर) हा मार्ग तात्पुरता स्वरूपात दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे. वसंतराव देशमुख पथ(घोले रोड येणारी वाहतूक) बंद करण्यात येत आहे. तसेच जे एम रोड वरून सुरभी लेन कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग—
मॉडर्न चौक—झाशी राणी पुतळा चौक—घोले रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. नागरिकांनी वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच वाहतूक कर्मचारी/स्वयंसेवक यांना सहकार करावे असे आव्हान वाहतूक पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.