
पुणे प्रतिनिधी
पुण्यात कोयत्याची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. सिंहगडाच्या पायथ्याशीच एका तरूणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. धक्कादायक म्हणजे, पोलिसांची मटणाची पार्टी सुरू होती, त्यापासून काही अंतरावरच तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
वारंवार होणाऱ्या कोयत्याच्या हल्ल्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीमध्ये एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालाय. हवेली पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांची मटण पार्टी सुरू होती. तेथून काही अंतरावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे सिंहगड परिसरातील घटनेने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला असून तपास सुरू आहे.
सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी येथे एका हॉटेलमध्ये रात्री हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पार्टी सुरु होती. तेथून काही अंतरावर तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तरूणाच्या हातावर,पायावर,डोक्यावर खोल जखमा झाल्या आहेत. तरूणावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अत्यंत गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. तरुणावर कोयत्याने वार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला असून जवळ सुरू असलेल्या पार्टीतील पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा हल्ला झाला नसता, असे म्हटले जात आहे. पुण्यात गावगुंडाच्या दहशतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे.