
नागपूर प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाने २६ जानेवारीला तिकीट दरात १५ टक्के वाढ केल्यानंतर आता एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षभरात चार महिन्यांचा पासवर कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना राज्यात कुठेही प्रवास करता येणार आहे.
मुख्यत: आजपर्यंत वर्षभरात दोन महिन्यांचा फॅमिली पास कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जात होता. मात्र, आता वर्षभरात चार महिन्यांचा फॅमिली पास कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मिळणार असल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी एक परिपत्रक असून त्यात नवीन योजनेची माहिती दिली आहे.
कुठेही प्रवास करता येणार
एसटी महामंडळाने एकीकडे तिकीट दरात १५ टक्के वाढ केली तर दुसरीकडे आता कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना राज्यात कुठेही प्रवास करण्यासाठी मोफत पास उपलब्ध करुन देत आहे. एसटी कामगार करार २००७-०८ च्या तरतुदीनुसार राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पासाची सवलत देण्यात येते. यापूर्वी दोन सत्रात दोन महिने मोफत पास मिळत होती. मात्र, यात वाढ करण्याची मागणी कर्मचार्यांनी केल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.
सवलतीचा लाभ साधारण व जलद बसेसमध्येFree travel pass for ST families एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना जानेवारी ते जून या सत्रात दोन महिने व जुलै ते डिसेंबर या दोन महिने असे चार महिने वर्षभरात कुठेही प्रवास करता येणार आहे. कर्मचार्यांना पास सवलतीचा लाभ केवळ साधारण व जलद बसेसमध्ये घेता येणार आहे. मात्र, शिवशाही, एशियाड बसेसमध्ये साधारण बसेसच्या तिकीटाच्या व्यतिरिक्त रक्कम भरून प्रवासाची सोय आहे. अधिकार्यांना प्रवास सवलत भत्ताराज्य परिवहन महामंडळात अधिकार्यांनी प्रवास सवलत भत्ता (एलटीसी) मिळत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवास सवलतीचा लाभ मिळत नाही. कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सवलत प्रवासाचा लाभ घेतात. राज्यभरात कुठेही कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी महामंडळाकडून पास काढावी लागणार आहे.