
मुंबई प्रतिनिधी
मोबाईलवर लिंक पाठवून बँक डिटेल्स घेऊन सुमारे एक लाख रुपयाचे फसवणूक केल्याप्रकरणी दक्षिण भारतीय दोन तरुणांना सायन पोलिसांनी अटक केली आहे.
सध्या डिजिटल पेमेंटच्या युगात सायबर क्राईम ची घटना दिवसेंदिवस उघड किस होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यात लाखोच्या रकमा हडप केले जात असताना सायन येथील एका प्रवाशाला मोबाईलवर लिंक पाठवून गोड गोड बोलून त्याच्याकडून बँक डिटेल्स घेऊन पंजाब नॅशनल बँकेतून एक लाख रुपयाचे रक्कम लंपास केले या सायबर गुन्हेगारांना सायन पोलिसांनी दक्षिण भारतातील चेन्नई तामिळनाडू येथून अटक केली आहे आरोपी कार्तिक विश्वनाथन, नंदकुमार यांना अटक केली आहे त्यांच्याकडून रोख सत्तर हजार रुपये हस्तगत केले आहेत या प्रकरणी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक खाडे, पोलीस शिपाई डबरे यांना चेन्नई येथे पाठवले होते. सदर पथकाने एकूण चार आरोपींना अटक केली नमुद पुण्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. अर्पणे गुजरात झारखंड तामिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश आदी ठिकाणाहून सायबर गुन्ह्याच्या तक्रारी दाखल आहेत. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. यात अधिक अधिक गुणांची उकल होण्याची शक्यता आहे.