• शहरात २३ ठिकाणी होणार मतमोजणी; १६ जानेवारीला निकाल
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार असून, त्याचा निकाल शुक्रवारी (१६ जानेवारी) जाहीर केला जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या महापालिकेच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी व्यापक आणि काटेकोर तयारी केली आहे.
मुंबईत एकूण २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षितता, पारदर्शकता आणि सुव्यवस्थेसाठी मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांना त्यांच्या प्रभागाची मतमोजणी नेमकी कुठे होणार आहे, याची माहिती मिळावी यासाठी आयोगाने केंद्रांची सविस्तर यादी जाहीर केली आहे.
मुंबईतील मतमोजणी केंद्रांची विभागनिहाय माहिती
आर उत्तर विभाग (प्रभाग १ ते ८)
मतमोजणी कक्ष : बृहन्मुंबई महानगरपालिका मंडई तळघर, रूस्तमजी संकुल, दहिसर (पश्चिम)
आर मध्य विभाग (प्रभाग ९ ते १८)
मतमोजणी कक्ष : नागरी प्रशिक्षण संस्था व संशोधन केंद्र, अभिनव नगर, बोरिवली (पूर्व)
आर दक्षिण विभाग (प्रभाग १९ ते ३१)
मतमोजणी कक्ष : बजाज महानगरपालिका शाळा, कांदिवली (पश्चिम)
पी उत्तर विभाग (प्रभाग ३२ ते ३५ व ४६ ते ४९)
मतमोजणी कक्ष : मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई), मालाड (पश्चिम)
पी पूर्व विभाग (प्रभाग ३६ ते ४५)
मतमोजणी कक्ष : मुंबई पब्लिक स्कूल संकुल, कुरार गाव, मालाड (पूर्व)
पी दक्षिण विभाग (प्रभाग ५० ते ५८)
मतमोजणी कक्ष : उन्नत नगर महानगरपालिका शाळा, गोरेगाव (पश्चिम)
के पश्चिम विभाग (प्रभाग ५९ ते ७१)
मतमोजणी कक्ष : शहाजी राजे भोसले क्रीडा संकुल, अंधेरी (पश्चिम)
के उत्तर व के पूर्व विभाग (प्रभाग ७२ ते ७९, ८०, ८१, ८६)
मतमोजणी कक्ष : गुंदवली महानगरपालिका शाळा, अंधेरी (पूर्व)
के पूर्व व एच पश्चिम विभाग (प्रभाग ८२ ते ८५, ९७ ते १०२)
मतमोजणी कक्ष : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, सांताक्रुझ (पश्चिम)
एच पूर्व विभाग (प्रभाग ८७ ते ९६)
मतमोजणी कक्ष : मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रुझ (पूर्व)
टी व एस विभाग (प्रभाग १०३ ते ११०, ११३, ११४)
मतमोजणी कक्ष : प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल, मुलुंड (पश्चिम)
एस विभाग (प्रभाग १११, ११२, ११५ ते १२२)
मतमोजणी कक्ष : सेंट झेवियर हायस्कूल, कांजूरमार्ग (पश्चिम)
एन विभाग (प्रभाग १२३ ते १३३)
मतमोजणी कक्ष : पंतनगर महापालिका शाळा, घाटकोपर (पूर्व)
एम पूर्व व एम पश्चिम विभाग (प्रभाग १३४ ते १५५)
मतमोजणी कक्ष : महापालिका शाळा संकुल, चेंबूर
एल विभाग (प्रभाग १५६ ते १७१)
मतमोजणी कक्ष : नेहरू नगर व शिवसृष्टी महापालिका शाळा संकुले, कुर्ला (पूर्व)
एफ उत्तर विभाग (प्रभाग १७२ ते १८१)
मतमोजणी कक्ष : नवीन महानगरपालिका शाळा, सायन (पूर्व)
जी उत्तर विभाग (प्रभाग १८२ ते १९२)
मतमोजणी कक्ष : डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल, दादर (पश्चिम)
जी दक्षिण विभाग (प्रभाग १९३ ते १९९)
मतमोजणी कक्ष : वरळी अभियांत्रिकी संकुल, वरळी
एफ दक्षिण विभाग (प्रभाग २०० ते २०६)
मतमोजणी कक्ष : पोलीस संकुल हॉल, दादर-नायगाव
डी व सी विभाग (प्रभाग २१४ ते २२२)
मतमोजणी कक्ष : विल्सन महाविद्यालय, गिरगाव
ई, बी व ए विभाग (प्रभाग २०७ ते २१३, २२३ ते २२७)
मतमोजणी कक्ष : रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी, भायखळा
कडक बंदोबस्त, पारदर्शक प्रक्रियेवर भर
मतमोजणीच्या दिवशी सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, तसेच निवडणूक निरीक्षकांची उपस्थिती असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईकरांनी दिलेल्या कौलातून महापालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याचा निर्णय अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


