मुंबई प्रतिनिधी
मुंबई : आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाची भीती, विशेषतः गणित विषयाबाबत तणाव जाणवतो. पाढे पाठ न होणे, भरपूर अभ्यास करूनही अपेक्षित गुण न मिळणे, मोबाईल-इंटरनेटचे वाढते व्यसन अशा समस्यांमुळे पालकही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर मानव अभ्यास संघातर्फे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोफत अभ्यास मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत पाढे सोप्या आणि झटपट पद्धतीने कसे शिकायचे, अभ्यास कसा करावा, परीक्षेची भीती कशी दूर करावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा आत्मविश्वास निर्माण होऊन विशेषतः गणित विषयात चांगले यश मिळण्यास मदत होईल, असा आयोजकांचा दावा आहे. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
ही कार्यशाळा सर्पमित्र प्रा. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दर शनिवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेचे स्थळ महिला मंडळ शाळा, गणेश मंदिराजवळ, कुर्ला स्टेशनजवळ, कुर्ला (प.) असे आहे.
नोंदणीसाठी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी ९८२०२२११७६ या क्रमांकावर नावाचा एसएमएस करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यशाळेस येताना वही व पेन सोबत आणावेत, असेही आयोजकांनी कळवले आहे.
मार्गदर्शक :- सर्पमित्र प्रा. सुनिल कदम, 9820221176


