मुंबई प्रतिनिधी
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अजून पूर्ण वेगात सुरू व्हायचा असतानाच उमेदवारांच्या संख्येने मात्र निवडणूक रणधुमाळी स्पष्ट केली आहे. मतदानाला अवघे १२ दिवस शिल्लक असताना काही ठिकाणी बिनविरोध निवडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सत्ताधाऱ्यांची खेळी की विरोधकांची हाराकिरी, असा सवाल उपस्थित होत असतानाच २९ महानगरपालिकांची अंतिम उमेदवार संख्या समोर आली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या एकूण २८६९ जागांसाठी तब्बल १५ हजार ९३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबई आणि पुण्यात उमेदवारांची संख्या लक्षणीय असून मोठ्या शहरांमध्ये बहुरंगी राजकीय लढतीचे चित्र दिसून येत आहे.
कुठे किती जागा, किती उमेदवार?
१) मुंबई – २२७ जागांसाठी १७०० उमेदवार
२) छत्रपती संभाजीनगर – ११५ जागांसाठी ८५९ उमेदवार
३) नवी मुंबई – १११ जागांसाठी ४९९ उमेदवार
४) वसई–विरार – ११५ जागांसाठी ५४७ उमेदवार
५) कोल्हापूर – ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार
६) कल्याण–डोंबिवली – १२२ जागांसाठी ४८९ उमेदवार
७) ठाणे – १३१ जागांसाठी ६५६ उमेदवार
८) उल्हासनगर – ७८ जागांसाठी (अंतिम संख्या जाहीर)
९) नाशिक – १२२ जागांसाठी ७३५ उमेदवार
१०) पुणे – १६५ जागांसाठी ११६६ उमेदवार
११) पिंपरी–चिंचवड – १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार
१२) सोलापूर – १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार
१३) अकोला – ८० जागांसाठी ४६९ उमेदवार
१४) अमरावती – ८७ जागांसाठी ६६१ उमेदवार
१५) नागपूर – १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार
१६) चंद्रपूर – ६६ जागांसाठी ४५१ उमेदवार
१७) लातूर – १८ जागांसाठी ३५९ उमेदवार
१८) परभणी – ६५ जागांसाठी ४११ उमेदवार
१९) भिवंडी–निजामपूर – ९० जागांसाठी ४३९ उमेदवार
२०) मालेगाव – ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार
२१) पनवेल – ७८ जागांसाठी २५५ उमेदवार
२२) मिरा–भाईंदर – ९५ जागांसाठी ४३५ उमेदवार
२३) नांदेड–वाघाळा – ८१ जागांसाठी ४९१ उमेदवार
२४) सांगली–मिरज–कुपवाड – ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार
२५) जळगाव – ७५ जागांसाठी ३३३ उमेदवार
२६) धुळे – ७४ जागांसाठी ३२० उमेदवार
२७) अहिल्यानगर – ६८ जागांसाठी २८३ उमेदवार
२८) इचलकरंजी – ६५ जागांसाठी २३० उमेदवार
२९) जालना – ६५ जागांसाठी ४५३ उमेदवार
महानगरपालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. उमेदवारांची ही प्रचंड संख्या पाहता शहरी राजकारणातील चुरस अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


