
पुणे (विभागीय प्रतिनिधी,सुनील कलशेट्टी
सेना दिन संचलन कार्यक्रमास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात उपस्थित राहणार आहेत.
भारत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सेना दिन संचलन कार्यक्रमास बुधवार (दि १५) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चंद्रमा चौक, होळकर पुलादरम्यान सकाळी ७ ते ११ सुमारास वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. आळंदी रस्ता चौक ते चंद्रमा चौक, चंद्रमा चौक ते होळकर पुलादरम्यान दुतर्फा वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. खडकीतील हॅरीस पूल, नगर रस्त्यावरील खराडी बाह्यवळण मार्ग, शास्त्रीनगर चौक, सादल बाबा चौक, विश्रांतवाडी चौकातून येरवड्याकडे जाणाऱ्या जड वाहनांना सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
असे आहेत वाहतुकीत बदल ?
१) शादल बाबा चौक ते चंद्रमा चौका मार्ग खडकी कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
२) वाहन चालकांनी शादल बाबा चौक, डॉ आंबेडकर चौक आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी, जुना होळकर पुला मार्ग इच्छित स्थळी जावे.
३) विश्रांतवाडी कडून होळकर पुलामार्ग खडकी कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
४) विश्रांतवाडी, साप्रस पोलीस चौकी मार्ग, जुना होळकर पुलामार्ग वाहन चालकांनी इच्छित स्थळी जावे.
५) बोपोडी चौक, खडकी बाजार, चर्च दरम्यान होळकर पूल येरवडा कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
६) वाहन चालकांनी पाटील इस्टेट, वाकडेवाडी मार्ग इच्छित स्थळी जावे.
७) जुन्या मुंबई–पुणे रस्त्यावरून अंडी उबवणी केंद्र ( पोल्ट्री चौक) परिसरातील भुयारी मार्गातून मुळा रस्ता मार्ग खडकी बाजार कडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.