पुणे( प्रतिनिधी, सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक ११ जानेवारी २०२५)—-राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह. ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५. भारतातील राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा लोकांना वाहतुकीचे नियमाचे पालन करण्याबद्दल प्रशिक्षित करण्याची एक उत्तम संधी आहे. याचे जाणीवपूर्वक पालन केले तर सुरक्षित प्रवास सर्वांनाच अनुभवता येईल.
भारतातील राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान लोकांमध्ये रस्ता सुरक्षा उपयांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांबद्दल शिक्षित करण्यासाठी साजरा केला जातो. रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी रस्ते अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमाचे पालन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार विविध कार्यक्रमाचे आयोजन करते. सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा , महाविद्यालये, आणि सामान्य जनता यांच्या सहभागासह आठवडाभर चालणारी ही मोहीम देशभरात पाळली जाते.
रस्ते अपघात हे देशातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे हे भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी राज्याने केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नाची पाहणी केली आहे. आणि मृत्युदर, दररोज अंदाजे ३२८ जीव गमावले जातात. त्यापैकी बरेच काही वेळेवर बचाव आणि हस्तक्षेपाने टाळता आले असते. असंख्य रस्ते सुरक्षा मोहीम आणि जागरूकता मोहीम असूनही, देशभरात अपघाताशी, कित्येक बळी पडतात.
भारतात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणारे नागरिक तसेच पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक विभागणी वेगळे नियम लागू केले आहेत. आपल्या मित्रांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमाची जाणीवपूर्वक पालन करण खूप गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय र्लोकांना वाहतूक नियमाबद्दल जागरूक करण्यासाठी हा सप्ताह साजरा करते. या काळात देशभरात विविध माध्यमे आणि पद्धतीद्वारे लोकांना वाहतूक नियमाची माहिती दिली जाते. यामुळे लोक सावधपणे वाहन चालवतील आणि रस्ते अपघात कमी होतील. नागरिकांच्या सुरक्षित प्रवाससाठी जनजागृती केली जाते.
११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ म्हणजेच भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. दरवर्षी एक आठवडा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी जनजागृती केली जाते. १९८९ मध्ये आपल्या देशात याची सुरुवात झाली. नागरिक सुरक्षितपणे वाहन चालवतात का ? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान वाहन चालक, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर वाहन चालण्याचे सुरक्षित मार्ग शिकवले जातात. त्यांना भारतातील वाहतूक नियमांची माहिती दिली जाते. रस्त्यावर बसविण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलची माहिती दिली जाते. यामध्ये चालकांच्या तपासणीचाही समावेश आहे. यासाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस पथनाट्य, परिसंवाद, रॅली, घोषणा कार्यक्रम, होर्डिंग बॅनर च्या माध्यमातून, सर्वसामान्य पर्यंत संदेश पोहोचवतात. रस्ते अपघात कमी करून नागरिकाचे जीवन सुरक्षित ठेवणे हा या सर्व मागील उद्देश आहे.
यंदाच्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीची असे ११ नियम पाहूया जे प्रत्येक नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरतील. वाहनाने प्रवास करणारे असून किंवा पादचारी प्रत्येकाने वाहतुकीचे हे नियम लक्षात ठेवायलाच हवे.
१) अतिवेग टाळा—भारतातील रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनाचा वेग होय. वाहनाचा वेग कमी केल्यास अनेक अनर्थ टाळू शकतात. त्यामुळे वाहन कोणतेही असो त्याचा वेग निर्धारित वेगाच्या मर्यादितच ठेवला पाहिजे.
२) ओव्हरटेक करू नका—रस्ते अपघाताची दुसरे प्रमुख कारण म्हणजे एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा. वाहनांना ओव्हरटेक करताना मोठ्या प्रमाणात टक्कर होऊन अपघात होतात म्हणून आपल्या सावकाश वाहन चालवा. इतरांना मागे सोडण्याच्या शर्यती स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकू नका.
३) नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला—-भारतातील वाहतुकीचे निर्माण पैकी महत्त्वाचा नियम म्हणजे नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला. वाहनाने प्रवास करणारे असो किंवा पादचारी असो तर असता एकेरी असो किंवा दुहेरी रस्त्याच्या डाव्या बाजूने प्रवास करणे सक्तीचे आहे. पुढे जाताना उजवीकडे वळावे लागल्यास इंडिकेटर करा, त्यानंतरच दिशा बदला.
४) मद्यपान (दारू पिऊन) करून वाहने चालू नका—दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच आहे कोणत्याही परिस्थिती दारू पिऊन गाडी चालू नका. अशा अवस्थेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटते. मद्यपान गाडी चालल्यास दंड आकारला जातो. कोणत्याही प्रकारची नशा करून गाडी चालवणे म्हणजे स्वतःच्या नियंत्रणाच्या जीवाशी खेळ ठरू शकतो.
५) ध्वनी भ्रमण (मोबाईल फोन टाळा)—आज काल सर्वात मोठी समस्या मोबाईल फोनची आहे मोबाईलवर बोलल्याने लक्ष विचलित होते. त्यामुळे तुम्ही वाहनावरील नियंत्रण गमावू शकता. रस्ता गर्दीचा असो किंवा रिकामा असो, वाहन चालवताना तुमचे संपूर्ण लक्ष वाहन चालविण्यावर ठेवा. खूप गरजेचे असेल तरच रस्त्याच्या कडेला गाडी थांबवा आणि मग फोनवर बोला.
६) झेब्रा क्रॉसिंग—-वाहनचालक आणि पादचारी दोघांनी वाहतूक नियमाचे पालन करणे तिथेच महत्त्वाचे आहे. पादचारी नेहमी पुढे पाच वरून चालावं, सर्विस लेनमध्ये किंवा अगदी डाव्या बाजूने चालावं, सर्विस लेन मध्ये किंवा अगदी डाव्या बाजूने चालावं. ट्रॅफिक सिग्नल ओलांडत असल्यास नेहमी झेब्रा क्रॉसिंग चा वापर करा.
७) चिन्ह ओळखा—-गाडी किंवा वाहन चालवायला शिकत असताना प्रथम वाहतूक चिन्हे ओळखायला शिका. लाल दिवा, हिरवा दिवा, डावे–उजवे वळण, वाहनाचा वेग, इत्यादीसाठी सिग्नल आणि संकेतांचा वापर करणे अत्यंत गरजेचे ठरते.
८) सुरक्षित अंतर ठेवा—-वाहनांमध्ये पुरेशी अंतर असावे. जेणेकरून समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावल्यास मागून येणारी वाहन त्याच्यावर आढळणार नाहीत.
९) हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर करा—जर तुम्ही दुचाकी वर असाल तर हेल्मेट गाणे सर्वात महत्त्वाची आहे. डोकं वाचलं तर जीवही वाचू शकतो. त्याचप्रमाणे, जर तुम्ही चार चाकी वाहनात असाल तर तुम्ही सीट बेल्ट वापरलाच पाहिजे.
१०) विनाकारण हॉर्न वाजू नका-हॉर्न हा कोणत्याही वाहनाचा महत्त्वाचा भाग असतो. पण गरज असेल तेव्हाच हार्न वाजवा. गर्दी पासून विनाकारण हार्ड वाजू नका. त्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते.
११) वाहन चालकांची प्रकृती चांगली असावी—वाहतुकीचा आणखी एक नियम आहे. चालक निरोगी असावा. त्याचे डोळे पूर्णपणे ठीक असले पाहिजेत. चालक आजारी किंवा थकलेला असेल वाहन चालवू नये.
वरील वाहतुकीचे नियम हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आले आहेत. याचे जाणीवपूर्वक पालन केले तर सुरक्षित प्रवास सर्वांनाच अनुभवता येईल.


