
सातारा | प्रतिनिधी
खंडोबामाळ झोपडपट्टी येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्ये फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या जयश्री काळेकर यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात नगरसेवक सुनील काळेकर यांनी जनतेसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.
यावेळी काळेकर म्हणाले, “जनसामान्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमची खरी दिवाळी आहे. समाजातील प्रत्येक घटकासोबत आनंदाचे क्षण वाटणे हेच आमचे ध्येय आहे.”
या कार्यक्रमास भाजपा सातारा शहर मध्य मंडळ अध्यक्ष अविनाश खर्शीकर, शहर बाह्य मंडळ अध्यक्षा वैशाली टंगसाळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमोल कांबळे, दीपक क्षीरसागर, महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी सुनिशा शहा, शहर सरचिटणीस अमोल टंगसाळे, उद्योग आघाडीचे नीलेश शहा तसेच कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि आनंदमय वातावरणात फराळाचे वाटप करण्यात आले.