
सातारा प्रतिनिधी
कला, साहित्य, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात बहुमुखी कार्य करणारे कर सल्लागार व लेखक कै. अरुण गोडबोले (वय ८१) यांचे मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते.
गोडबोले यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सातारा भूषण पुरस्कार’ सुरू केला होता. सामाजिक जाण आणि दातृत्वासाठी ओळखले जाणारे गोडबोले हे युनायटेड वेस्टर्न बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत होते. बँकेच्या प्रगतीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.
करसल्लागार या व्यावसायिक क्षेत्रासोबतच त्यांनी चित्रपट निर्मिती, लेखन आणि अध्यात्म या क्षेत्रांतही उल्लेखनीय कामगिरी केली. ‘कशासाठी प्रेमासाठी’ या चित्रपटाचे त्यांनी निर्मिती-दिग्दर्शन केले; तसेच अनेक कविता, ललित लेख, प्रवासवर्णने आणि करविषयक पुस्तके त्यांनी लिहिली.
सतत लेखन करणारे आणि समाजसेवेची नाळ जपणारे हे संवेदनशील व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील.
त्यांना ज्ञानविकास मंडळ आणि प्रसाद चाफेकर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.