
पत्रकार :उमेश गायगवळे
ठाणे… मिरा रोड येथील एक व्यापारी याची शुक्रवारी अज्ञात इस्मानी मिरा रोड उपनगरातील शांती शॉपिंग सेंटर मध्ये गोळ्या झाडून हत्या केली.
मिरा रोड पूर्व भागातील शांती शॉपिंग सेंटर मध्ये शुक्रवारी रात्री १० वाजता अज्ञात इस्मानी व्यापारी मोहम्मद तबरेज अन्सारी याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अन्सारी एका गंभीर खटल्यातील प्रमुख साक्षीदार होते. त्यांना गेल्या काही दिवसापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केली होती. या हत्येनंतर नया नगर पोलिसांनी परिसराची नाका बंदी करून सीसीटीव्ही फुटेज पुरावे गोळा करून या संदर्भात संशयित पाच जणांना अटक करण्यात आली आहे.