
पुणे (विभागीय प्रतिनिधी सुनील कलशेट्टी
पुणे (दिनांक ३ जानेवारी)-सुंधा माता नगर येथील नागरिक मूलभूत सुविधापासून वंचित, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष तर खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल व हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकाच्या मूलभूत सुविधेसाठी पुढाकार घेऊन स्व:खर्चातून दिनांक २९ वार रविवार रोजी स्ट्रीट लाईटचे दिवे बसवण्यात आले.
सुंधा माता नगर मधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा कडे प्रशासन कानाडोळा करत असून नुसती बघायची भूमिका घेत आहे का ? असा प्रश्न नागरिकांतून बोलले जात आहे. नागरिकांच्या पुढे अनेक प्रश्न तोंड असून उभे आहेत. रस्त्याचे प्रश्न, गटारीची सांडपाण्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, स्ट्रीट लाईटचे दिवे अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाकडे नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केले असता त्याचे कोणीच दखल घेतली जात नाही. असे दैनिक युवक आधार प्रतिनिधीशी बोलताना सुंधा माता नगरचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तर या नागरिकांच्या विविध प्रश्नासाठी शंकर चव्हाण खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे अध्यक्ष महेश इंगवले, हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे अध्यक्ष पै अजय साबळे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष पुणे दत्ता कांबळे (युवा उद्योजक) यांच्याशी संपर्क साधून वरील समस्येबाबत संपूर्ण माहिती सांगितली. त्यानंतर वरील पदाधिकाऱ्याने सुंधा माता नगर येथील स्ट्रीट लाईटचे दिवे स्व:खर्चाने बसवले. त्याबद्दल सुंधा माता नगरचे अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी आभार मानले. तर या कामाबद्दल सुंधा माता नागरिकाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.