
शिरवळ प्रतिनिधी
साताऱ्यातील शिरवळ येथे मंगळवारी दुपारी भर बाजारपेठेत दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रियाज उर्फ मन्या इकबाल शेख याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत शेख जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वैमनस्यातून ही घटना घडल्याचे समजते. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
दरम्यान, शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. अलीकडेच बीडमध्ये सरपंचाने हवेत केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच साताऱ्यातील या घटनेमुळे राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.