
मुंबई प्रतिनिधी
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) संघटन बळकट करण्यासाठी मुंबई विभागात रचनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने काल बाळासाहेब भवन येथे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत, पक्षाचे सचिव संजय मोरे आणि सचिन जोशी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्त विभाग प्रमुख व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान विभाग क्रमांक ७ चे प्रमुख कुणाल सरमळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मजबूत सत्ता निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला.