
मुंबई, प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या संदेशाने खळबळ उडाली. बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. तातडीने पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली.
धक्कादायक उलगडा
धमकीमागे दहशत नव्हे तर ‘सूड’
नोएडातील ५१ वर्षीय अश्विनी कुमार याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो मूळ पाटण्याचा असून स्वतःला ज्योतिष म्हणून सांगतो. चौकशीत त्याने मित्राला धडा शिकवण्यासाठी धमकीचा मेसेज पाठविल्याचे कबूल केले.
वैमनस्यातून कट
मित्र फिरोजला अडकवण्याचा डाव
पैशाच्या व्यवहारावरून वाद झाल्यानंतर फिरोजने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तीन महिने तुरुंगवास भोगल्यानंतर अश्विनीने सूडाच्या भावनेतून फिरोजच्या नावाने धमकीचा संदेश पाठवला.
पोलिसांची कारवाई
७ मोबाईल, ३ सिमकार्ड, डिजिटल साधने जप्त
अश्विनीच्या ताब्यातून मोबाईल व इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपीने स्वतःला दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे भासवले; मात्र हेतू दहशत नव्हता, तर वैयक्तिक सूड होता.’