
मुंबई प्रतिनिधी
मुंबई-ठाणे परिसरात स्वतःचे घर असावे, हे अनेकांचे स्वप्न. मात्र आकाशाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांना हे स्वप्न पूर्ण करणे अवघड ठरते. अशा वेळी म्हाडा घरखरेदीदारांसाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे.
लॉटरी न लावता थेट विक्रीद्वारे फ्लॅट्स खरेदी करता येणार असून, या विक्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. कोणत्या प्रकल्पांतील घरे उपलब्ध होणार, त्यांची किंमत किती असणार आणि खरेदीसाठी प्रक्रिया कशी असेल, याबाबत म्हाडाकडून लवकरच तपशील जाहीर होणार आहे.
मुंबई आणि ठाणे या ठिकाणी घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले.