
मुंबई प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर, मंगळवारी आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या.
नवीन आदेशांनुसार, अजित कुंभार (IAS:2015) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAIDC), मुंबई येथे नियुक्ती झाली आहे.
तृप्ती धोडमिसे (IAS:2019) यांची बदली सांगलीवरून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तर विशाल नरवडे (IAS:2020) यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
याआधी काही दिवसांपूर्वी योगेश कुंभजेकर, वर्षा मीना, संजय चव्हाण, भुवनेश्वरी एस. आणि रघुनाथ गावडे या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.
माहिती विभागातील पदोन्नती
दरम्यान, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले आहेत.
• किरण वाघ यांची मुंबई मुख्यालयात वरिष्ठ सहायक संचालक म्हणून बदली.
• मंगेश वरकड यांची वर्धा येथे माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती.
• शैलजा वाघ दांदळे यांची भंडारा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती.
• राजेश येसनकर यांची चंद्रपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती.
• ब्रिजकिशोर झंवर यांची मुंबईत वरिष्ठ सहायक संचालक म्हणून नियुक्ती.