सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कराड, फलटण, दहिवडी आणि सातारा ग्रामीण विभागातील चार पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, तर जिल्ह्यातील आठ सहायक पोलीस निरीक्षकांना (एपीआय) पदोन्नती मिळून पोलीस निरीक्षक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डीवायएसपींच्या बदल्यांची यादी
* राजश्री पाटील – सांगली तुरची प्रशिक्षण केंद्र → कराड उपअधीक्षक
* विशाल खांबे – जालना → फलटण उपअधीक्षक
* अमोल ठाकूर – कराड → ठाणे शहर, पोलीस उपायुक्त
* सोनाली कदम – सातारा ग्रामीण → सांगली तुरची प्रशिक्षण केंद्र
* अश्विनी शेंडगे – दहिवडी → गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे
* राहुल धस – फलटण → नवी मुंबई, पोलीस उपायुक्त
आठ एपीआयंची बढती
राज्यातील एकूण ३६१ सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळत आहे, ज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लवकरच पदोन्नतीनंतर त्यांची राज्यभर बदली होणार आहे.
साताऱ्यातील पदोन्नतीसाठी निवडलेले अधिकारी:
१)रमेश गर्जे – भुईंज पोलीस ठाणे
२)श्याम काळे – सातारा शहर पोलीस ठाणे
३)रवींद्र तेलतुंबडे – पोलीस अधीक्षकांचे वाचक
४)किरण भोसले – तळबीड पोलीस ठाणे
५)राजेंद्र चौधरी – आर्थिक गुन्हे विभाग
६)ज्ञानेश्वर धनवे – अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक
७)अविनाश मते – औंध पोलीस ठाणे
८)नितीन नम – (कार्यरत)
गृह विभागाने याबाबतची माहिती मागवली असून, पुढील आठवड्यात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.


