
सातारा प्रतिनिधी
सातारा दि. १९ : ‘न्याय आपले दारी’ या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या वतीने सातारा जिल्ह्यात २१ जुलै ते १९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पॅनेल प्रमुख बी.डी. खटावकर (निवृत्त न्यायाधीश) हे मोबाईल लोकअदालतीचे कामकाज पाहणार आहेत.
गावपातळीवरील प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील केली जाणार आहेत. याशिवाय बँका, मोबाईल कंपन्या, वीज वितरण कंपन्या यांची वादपूर्व प्रकरणेही मोबाईल लोकअदालतीत हाताळली जाणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांनी जिल्ह्यातील नागरिक, विधीज्ञ, वित्तीय संस्था आणि मोबाईल कंपन्यांना या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या मोहिमेदरम्यान प्रत्येक तालुक्यात एक लोकअदालत आणि एक विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
जुलै २०२५:
२१ – कुडाळ (जावली), २२ – बिभवी (जावली), २३ – खिंगर (महाबळेश्वर), २४ – नाकिंडा (महाबळेश्वर), २५ – मेनवली (वाई), २८ – आसले (वाई), २९ व ३० – पळशी (खंडाळा), ३१ – वाठार (निंबळकर, फलटण).
ऑगस्ट २०२५:
१ – साखरवाडी (फलटण), २ – पिंगळी बुद्रुक (माण), ४ – राणद (माण), ५ – दिवड (माण), ६ – माळवाडी (वरकुटे, माण), ७ – साठेवाडी (खटाव), ८ – गणेशवाडी (खटाव), ११ – कोरेगाव (कोरेगाव), १२ – सातारा रोड (कोरेगाव), १३ – अडूळ (पाटण), १४ – येरफळे (पाटण), १८ – उंब्रज (कराड), १९ – पाल (कराड).
नागरिकांनी प्रलंबित वाद मिटवण्यासाठी या लोकअदालतीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.