
मुंबई प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण योजना’मुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेक महिलांनी या योजनेच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई बँकेने लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दरेकर म्हणाले, “आतापर्यंत महिलांना ९ टक्के दराने कर्ज देण्यात येत होते. मात्र आता आम्ही हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देणार आहोत. सरकारच्या चार प्रमुख महामंडळांच्या योजनांच्या माध्यमातून महिलांना व्याज सवलत दिली जाणार आहे.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच विविध महामंडळाच्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करीत आहे. या लाभार्थी महिलांना आता आर्थिकरित्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी सांगितले. pic.twitter.com/4gxfUBFROp
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 19, 2025
या योजनेतून पर्यटन महामंडळाच्या ‘आई योजना’सह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या-विमुक्त जातीसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळ यांचा समावेश आहे. या योजनांच्या अनुषंगाने महिलांना १२ टक्क्यांपर्यंत व्याज परतावा दिला जातो.
मुंबई बँकेकडून स्पष्ट करण्यात आले की, जर लाभार्थी महिला या कोणत्याही योजनेंतर्गत पात्र असतील, तर त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कर्ज मिळवण्यासाठी संबंधित महिलांनी मुंबई बँकेकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची तपासणी करण्यात येणार असून, सर्व अटी पूर्ण झाल्यानंतरच कर्ज वाटप केले जाईल.
मुंबई बँकेकडे सध्या सुमारे १ लाख महिला सभासद आहेत आणि १२ ते १३ लाख महिला ‘लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थी आहेत. यापैकी अनेक महिलांना या कर्ज योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, त्यातून महिलांना नव्या उद्योगाची संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लाडक्या बहिणींच्या उद्योग-व्यवसायासाठी आणलेल्या कर्ज धोरणास राज्य सरकारच्या व्याज परतावा योजनेची सांगड घालून शून्य टक्के व्याजदरात कर्ज देऊन महिलांना उद्योग व्यवसायात स्वावलंबी करण्याचा निर्णय आज मा.मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांनी… pic.twitter.com/9xrD94n8NU
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 19, 2025