
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी
अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलाचे अपहरण
केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा
तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. याबाबत
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28
रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास
कारंडवाडी, ता. सातारा येथील राहत्या
घरातून आर्यन संतोष देवकर या
अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण
केल्याची फिर्याद सातारा तालुका
पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
अधिक तपास महिला पोलीस हवालदार
बोराटे करीत आहेत.