
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील विक्रोळी पूर्व परिसरात एका २५ वर्षीय तरुणीने २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना इतकी भयंकर होती की तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
विक्रोळीतील कन्नमवार परिसरात घडलेल्या घटनेनं भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे.
कन्नमवार नगरमध्ये २२ व्या मजल्याच्या टॉवरवरून तरुणीनं उडी मारलीय. तिचं नाव हर्षदा तांदोलकर असं आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये इमारत क्रमांक ९७ मधील टॉवरवरून तिने उडी मारली.
हर्षदाच्या शरीराचे जमिनीवर कोसळून दोन तुकडे झाले आहेत. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला असून मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. या घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
आत्महत्या टाळण्यासाठी उपाय आणि मदत
मानसिक तणाव, चिंता, किंवा नैराश्य यामुळे अनेकजण निराश होऊन आत्महत्येचा विचार करतात. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तींशी मनमोकळं बोलणं, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं, किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे.