पुणे प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच ठिकाणी पावसामुळे हाहाकार उडाला आहे,
पुणे – सोलापूर महामार्गावर पाटस येथे ढगफूटी सदृश्य पाऊस पडल्याने रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला पुणे- सातारा महामार्गावर माती खचून क्रॅक पडल्याची घटना घडल्याने वाहनचालकांच्या समोर संकट उभे राहिले होते. त्यामुळे घाटातून कार चालवणे रिस्की झाले असतानाच पुणे – सोलापूर महामार्गावर पावसाच्या माऱ्याने पाणी तुंबून त्यात इनोव्हा कार वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोकणात आणि आजूबाजूच्या भागात येत्या दोन दिवसात मान्सून सक्रीय झाला आहे. जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा वेध शाळेने दिला आहे. रायगड जिल्ह्याला तर मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशात आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाने पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस येथे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळ्याने पाण्याचा पुर येऊन त्यात एक इनोव्हा कार वाहून गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायलर होत आहे. इनोव्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.


