धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने आईचा मृत्यूझाल्याची घटना घडली आहे.
टिपाबाई रेबला पावरा असं मृत्यू झालेल्या आईच नाव आहे. तर आवलेस रेबला पावरा असे आरोपी मुलाचं नाव आहे.
काही तासातच पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाठोडे गावातील देवेंद्र बिलेसिंग राजपूत यांच्या ताजपुरी शिवारातील शेतात काम करणाऱ्या टिपाबाई रेबला पावरा या महिलेने जेवणासाठी मासे बनवले होते. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून टिपाबाई रेबला पावरा यांचा मुलगा आवलेस रेबला पावरा याने आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये टिपाबाई पावरा यांचा मृत्यू झाला आहगे. यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपी आवलेस पावरा याला ताब्यात घेतले आहे.


