
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील विधानभवन परिसरात अचानाक आग लागल्याची घटना घडली. येथील आगीच्या धुराचे लोट पाहून परिसरात गोंधळ उडाला होता. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पाहणी केली असून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फायर एक्टिंग्युशन यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे.
विधानभवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशिन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्याने ही छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशन दलाच्या जवानानीआग नियंत्रणात आणली
आगीच्या दुर्घटनेत सर्व कर्मचारी सुरक्षित असून कर्मचारी लागलीच बाहेर आले होते. त्यामुळे, कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
शिवसेना पक्षाचे अनेक नेते याठिकाणी उपस्थित होते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही आगीच्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमवेत रिसेप्शन हॉलची पाहणी केली.
अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून स्कॅनिंग मशिनची पाहणी करण्यात आली आहे.
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाडीनेही तत्काळ विधानभवन परिसर गाठला होता. परिस्थिती नियंत्रण असून कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र, अग्निशमन दल अलर्ट आहे.
दरम्यान, विधानभवन परिसर म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च सभागृह असून आमदार, खासदार, मंत्री आणि प्रमुख नेत्यांची येथे कायम रेलचेल असते.