
पनवेल प्रतिनिधी
भाजप नेते तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या गाडीला पनवेलजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे, पुढील वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने शेख यांची गाडीने त्या वाहनाला जोरात धडक दिली.
या अपघातात हाजी अराफत शेख यांच्या पायाला जखम झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हाजी अराफत शेख हे हे मुंबईहून पनवेलच्या दिशेने प्रवास करत असताना, खोपोली जवळ पुढील वाहनांने अचानक ब्रेक मारल्यामुळे ६ वाहने एकमेंकांवर आदळली. यात शेख यांची कारही धडकली. यामध्ये त्यांना पायाला दुखापत झाली असून, वाहनाचेही नुकसान झाले आहे. घटनेनंतर शेख यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.