
वसई-विरार: मौजे काशीद कोपर परिसरातील खानिवडे गावाजवळील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व कारवाईच्या टाळाटाळीमुळे अद्यापही कायम आहे. शेरे पंजाब हॉटेलजवळ भूमाफिया साजिद याने मुंबई-अहमदाबाद हायवेच्या लगत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकाम उभे केले आहे. या बांधकामाने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, तर प्रशासनावर बिल्डर लॉबीचे समर्थन केल्याचे गंभीर आरोप होत आहेत.
भूमाफियाचा ‘खुला आव्हान’:
साजिद नावाचा भूमाफिया खुलेआम पालिका प्रशासनाला आणि कायद्याला आव्हान देत, बेकायदेशीर बांधकाम करत असल्याचे आरोप आहेत. हे बांधकाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाले असून नुकतेच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, यावर तोडक कारवाई करण्यासाठी जबाबदार अधिकारी सहआयुक्त गिल्सन गोन्साल्विस आणि अतिक्रमण उपायुक्त अजित मूठे यांच्यावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप होत आहेत.