
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे गावात उभारण्यात आलेल्या अद्यावत सुविधांनी सुसज्ज ‘मिलन वृद्धाश्रम’चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ख्यातनाम डॉ. जलील पारकर यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमामध्ये एकूण २८ खोल्या असलेल्या या वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान, सुरक्षितता आणि आपुलकी यांचे हक्काचे घर निर्माण झाले आहे.
या लोकार्पण कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, मंत्री योगेश कदम, आमदार प्रसाद लाड, तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार भाई जगताप यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मंडणगड तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आता एक नवे आधारस्थान उपलब्ध झाले असून, त्यांच्या सन्मानपूर्ण आणि सुरक्षित आयुष्यासाठी ही सुविधा मोलाची ठरणार आहे.